Book Publication | प्रमोद सुमन श्रीधर जाधव यांचे ८ पेटंट्ससह शास्त्रीय पुस्तक प्रकाशित

 Book Publication | प्रमोद सुमन श्रीधर जाधव यांचे ८ पेटंट्ससह शास्त्रीय पुस्तक प्रकाशित

Book Publication | प्रमोद सुमन श्रीधर जाधव यांचे ८ पेटंट्ससह शास्त्रीय पुस्तक प्रकाशित



नगर - गणित, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सिम्बॉलिक संगणन क्षेत्रातील पुणेस्थित संशोधक प्रमोद सुमन श्रीधर जाधव यांनी वर्ष २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी केली. त्यांनी एकाच वर्षात ८ महत्वाचे पेटंट्स दाखल केले आहेत. 


त्याबरोबर Symbolic Logic Field System (SLFS): A Recursive Framework for Post-Human Intelligence हे नवे शास्त्रीय पुस्तक  प्रकाशित केले. प्रमोद सुमन जाधव हे मुळचे अहमदनगरचे रहिवाशी आहेत. त्यांचे अहमदनगर पुण्यासह सर्व महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.



त्यांच्या महत्वाच्या संशोधनामुळे नेटवर्क्सचे ऑप्टिमायझेशन, सायबर सुरक्षा, एआय निर्णयप्रक्रिया, इमेज-व्हिडिओ साठवणूक, इलेक्ट्रिक वाहने आणि ड्रोनसाठी नवीन बॅटरी रचना यांसारख्या अनेक क्षेत्रांना नवी दिशा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सिम्बॉलिक लॉजिक फील्ड सिस्टीम (SLFS) हे भविष्यातील पोस्ट-ह्युमन इंटेलिजन्स  घडविणारे आर्किटेक्चर मानले जात आहे.



अधिक माहिती देताना जाधव यांनी सांगितले, २२व्या शतकात ही बुद्धिमत्ता बिग बँगपूर्वीचे गूढ प्रश्न आणि वैज्ञानिक विरोधाभास सोडवेल. मानवजाती ‘Alien-level intelligence’ साध्य करून विश्वाकडे नव्या दृष्टीने पाहील. अधिक माहितीसाठी त्यांना  jadhav.009@gmail.com आणि 9272079869 / 8329394125 या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या