Onam Savedi | नगरमध्ये ओणम उत्साहात साजरा

Darshak
0

Onam Savedi | नगरमध्ये ओणम उत्साहात साजरा 

Onam Savedi | नगरमध्ये ओणम उत्साहात साजरा


            

Onam Savedi | नगर : दर्शक |

केरळ राज्यात नववर्षाची सुरूवात ओणम या सणापासून होते.त्यामुळे केरळी लोकं हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.नगरमध्येही सर्वानी हा उत्सव साजरा केला असून नगर शहरात केरळी व मल्याळी कुटूंबियांची असंख्य घरे आहेत,येथील मजदूर सेनेचे पदाधिकारी व भाजप साऊथ इंडियन सेलचे जिल्हाध्यक्ष वसंत सिंग यांच्या सावेडी येथील घरी आज ओणम साजरा करण्यात आला त्यानिमित्त घरापुढे फुलांची रांगोळी काढण्यात आली होती यावेळी वसंतसिंग,हेमा वसंत,गिरीष्मा वसंत,स्नेहा वैष्णवी,लक्ष्मी आदीसह अनेक मान्यवर व मित्र परिवार  उपस्थित होते. सर्वानी एकत्रित केळीच्या पानावर बसून केरळी जेवणाचा आस्वाद घेतला व पारंपरिक नृत्य केले 




              हा सण दिवाळी सारखा असून वामन अवतारातील बळीराजा/महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.पातळात गेलेला बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी या दहा दिवस पृथ्वी वर येतो त्याच्या स्वागतसाठी घराच्या पुढे फुलाच्या रांगोळ्या काढल्या जातात  ओनम च्या सणांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस असतो हनुमान तिरु ओनम या दिवशी मल्याळी नागरिक घराच्या समोर फुलांची रांगोळी  काढतात त्याला याला पुककलम म्हणतात  यादिवशी इतर समाजाचे नागरीक शुभेच्छा देण्यासाठी केरळी बांधवांच्या घरी  येतात




              ओणम हा दिवस केरळी बांधवांसाठी मोठा उत्साहाचा आहे.ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.त्याचं पूजन मोठ्या उत्साहात केलं जातं.दक्षिण भारतामधील केरळमध्ये ओणम सणाचे फार महत्व आहे.तर शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात १० दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.या दिवसात दक्षिण भारतीय महिला घराला फुलांनी सजवतात. या दिवसात केरळवासिय एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणीत करताना दिसून येतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top