माता-भगिनींसाठी मोफत मोहटा देवी दर्शनाला प्रारंभ
नगर : दर्शक
विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे योगेश सोनवणे व त्यांच्या मित्रमंडळींनी कुठल्याही पद नसताना आपल्या शब्दावर ठाम राहून राजकीय स्पर्धां न ठेवता अकराव्या वर्षी मोहटा देवी चे दर्शन नवरात्रात माता भगिनींना घडावे यासाठी त्यांना घेऊन जात आहे त्यांचे हे आयोजन अभूतपूर्व आहे, अनेक लोक असे आहेत पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात
पदावर आल्यावर यात्रा बंद करतात पण माझा हा सर्वसामान्य कार्यकर्ता अशा यात्रा थांबवत नाही त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे त्याला व त्याच्या मंडळाला मी धन्यवाद देतो असे कौतुक खासदार सुजय दादा विखे यांनी केले व अप्रत्यक्षरीत्या मोहटा देवी मोफत दर्शन यात्रा बंद केल्याबद्दल खासदार निलेश लंके यांना मारला
सावेडीतील टिव्ही सेंटर,येथील विघ्णहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेशभाऊ सोनवणे पाटीलहे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम कायम राबवित असतात गेली १० वर्षे ते परिसरातील महिलांना मोहटा देवी दर्शन घडवीत आहे त्याच्या या ११ वर्षीचा दर्शनाचा शुभारंभ मा खासदार सुजय विखे यांच्या हस्ते आज करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते यावेळी धनंजय जाधव, अनिल भाऊ बोरुडे ,नितीन शेलार, महेश गुगळे ,हर्षल बोरा आदींसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते,मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.रोज माता भगिणीना दर्शन घाडीविनार असून या यात्रेसाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com