Laxman Hake Car | सभेला जाताना लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ल्याची घटना

 Laxman Hake Car | सभेला जाताना लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ल्याची घटना 

Laxman Hake Car | सभेला जाताना लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ल्याची घटना



नगर : दर्शक । "ओबीसी समाजाचा मेळावा नगरच्या पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे आयोजित करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके त्यासाठी नगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, त्यापू्र्वी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून लक्ष्मण हाके यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. यावेळी अज्ञात हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते घटनास्थळाहून पसार झाले.


सभेला जाताना त्यांच्यावर हल्ल्याची घटना घडली

नगरमधील बायपास रोडवर सारंगी हॉटेल जवळ हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नगरमधील दैत्य नांदूर येते ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा आहे. या सभेला जाताना त्यांच्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


ज्या घटना घडल्या त्याघटनावर थोडासा मी निराश होतो

आजच्या सभेबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, लोकांचा खूप आग्रह आहे. मायक्रोतल्या मायक्रो घटकाचा म्हणजे छोट्या छोट्या ओबीसीमधल्या लोकांचा सुद्धा आग्रह आहे. त्यामुळे मी दैत्यनंदुरला जातो आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्याघटनावर थोडासा मी निराश होतो. त्या संदर्भात मी संवाद साधणार आहे. पोस्टरवर फोटो असला नसला तरी लक्ष्मण हाके काही थांबणार नाही.


मराठा आरक्षणाचा जीआर कसा रद्द होईल, याकडे आमचं लक्ष 

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मला राजकारण करायचं नाही, भविष्यात या सामाजिक चळवळीचा रूपांतरण कशात होईल ते मी बोलत नाही, पण आता आज रोजी माझं राजकीय ध्येय नाही. मला माणसं 500 आहेत का हजार आहेत का 2000 आहेत का पन्नास हजार आहेत याच्याशी मला देणंघेणं नाही मला आमचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत कसा पोहोचवायचा आहे. मराठा आरक्षणाचा जीआर कसा रद्द होईल, याकडे आमचं लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या