Voice of Media | व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य स्तरीय कोअर कमिटीवर शेख ईदरीस यांची निवड
Voice of Media | संगमनेर : दर्शक ।
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ५२ देशात कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संघटना,व्हाईस ऑफ मीडियाच्या अंमळनेर येथे दोन दिवसीय राज्य स्तरीय केडर कॅंप चे आयोजन करण्यात आले होते.विविध जिल्ह्यातुन सुमारे दोनशे हून अधिक पत्रकार सदस्य येथे आले होते,
विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी ऊर्दू पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या व महाराष्ट्र राज्य स्तरीय ऊर्दू विंगच्या कोअर कमिटी वर शेख ईदरीस यांची निवड घोषित केली.
तसेच राज्य स्तरीय ऊर्दू कमिटी स्थापन करण्याची सर्व जबाबदारी शेख ईदरीस यांच्या कडे सुपुर्त केली.या प्रसंगी संस्थेच्या महासचिव दिव्या भोसले, ऊर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी, उपायुक्त डॉ कपिल पवार, जेष्ठ पत्रकार विश्वास देवकर, गोरक्षनाथ मदने, अमोल मतकर,भरत रेघाटे, बाळासाहेब गडाख उपस्थित होते.
ही निवड झाल्याबद्दल संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, सर्व सदस्य योगवर्धिनीचे योग तज्ज्ञ डॉ सुधाकर पेटकर, संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ, नवभारत टाइम्स चे उपसंपादक वसीम खान, लियाकत खान नाशिक, डॉ जी.पी.शेख,सा.दर्शक नगरचे संपादक शेख रियाज भाई, सा.मखदूमचे संपादक आबिद दूल्हे खान,जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरचे उपाध्यक्ष सय्यद असिफ अली, अब्दुल्ला चौधरी,सोहेल शेख कोपरगाव,माजी नगरसेवक शेख हबीब बाबु,शानु बेगमपुरे, गफ्फार शेख आदींनी अभिनंदन केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com