Kedgao | कोतकर गट केडगाव मधील 8 जागेवर ठाम , उमेदवारांची बैठक संपन्न,सर्व पक्षात खळबळ
नगर : दर्शक
नगर _ महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती व महा आघाडी होणार का नाही याची सर्व मतदारांमध्ये चर्चा असतानाच आज केडगाव येथे भानुदास कोतकर यांच्या गटाच्या उमेदवारांची बैठक संपन्न झाली यामध्ये केडगाव मधील आठ जागेवर दावा केला असून पक्षाकडे आठ जागा देण्याची विनंती केलेली आहे यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे
भानुदास कोतकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला सागर सातपुते, भूषण गुंड, सविता कराळे, लता बोरगे, प्रतिभा कोतकर, धनश्री कोतकर, महेश सरोदे ,भरत कांबळे ,गौरी नन्नवरे हे उमेदवार उपस्थित होते
यावेळी बोलताना उमेदवार म्हणाले घेतला आम्ही आठ जागा घेणार यामध्ये तडजोड होऊ शकत नाही पक्षाने जर आठ जागा दिल्या तर आम्ही सोळा व सतरा मधील आठ उमेदवार तसेच प्रभाग 15 मधील चार उमेदवार असे 12 उमेदवार निवडून आणून कारण प्रभाग 15 मध्ये कोतकर गटाचे समर्थक व मतदार मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे 12 पैकी फक्त आठ जागा मागत आहोत याबाबत त्यांनी पक्षाचे फॉर्म पण भरलेले आहे व तशी मागणी ही केलेली आहे
कारण सध्या महायुतीमध्ये जागा वाटपाचा घोळ चालू असून यामध्ये शिंदे गट व भाजप युती जरी फिक्स असली तरी शिंदे गटाला सन्मान जनक जास्त जागा पाहिजे आहेत तर राष्ट्रवादीची ताकद शहरात जास्त आहे त्या प्रमाणात त्यांनाही जागा हव्यात तशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यामुळे सर्वच पक्षात हा पेच निर्माण झाला आहे त्यातच आज केडगाव ने जर काही वेगळा निर्णय घेतला तर काय? यामुळे सर्वच पक्षात खळबळ उडाली आहे तसेच शहरातील काही प्रभागांमध्ये 4 उमेदवार एकत्र येऊन पॅनल करण्याच्या पण तयारीत आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com