प्रत्येक फुलं व प्रत्येक मुलं वेगवेगळी असतात – डॉ. सौ. शिल्पा गायकवाड

 टेंडर हार्ट्स प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

प्रत्येक फुलं व प्रत्येक मुलं वेगवेगळी असतात – डॉ. सौ. शिल्पा गायकवाड







नगर – बालवयापासून पालकांनी मुलांना घडवताना मुलांच्या बुद्धिमत्तेचा विचार केला पाहिजे. बुद्धिमत्तेचे एकूण आठ प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता, नैसर्गिक, वैज्ञानिक, प्रिमिटिव्ह इत्यादी पैकी एक तरी गुण आपल्या पाल्यांच्या अंगी असतोच. हे ओळखणे पालकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन डॉ. सौ. शिल्पा गायकवाड यांनी केले.



सावेडी व केडगाव येथील श्री साई समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित टेंडर हार्ट्स प्री स्कूलच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन डॉ. सौ. शिल्पा गायकवाड व  डॉ.अरविंद गायकवाड, सुभाष लवांडे, एलआयसी ऑफिसर विकास बडे  यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय आगवान, प्राचार्य सौ. शिल्पा आगवान, सौ. वर्षा आगवान उपस्थित होते.



मुलांची जडणघडण करीत असताना त्यांना आपल्या कुटुंबाची अर्थव्यवस्था समजून सांगणे गरजेचे आहे. मुलांचा ताबा घेऊ नका, मुलांना शिस्त लावा, त्यांना स्वतःच्या कामाची जबाबदारीची जाणीव होऊ द्या. मुले आई-वडिलांना पाहून मोठी होत असतात. मोबाईलपासून मुलांना लांब ठेवा. प्रत्येक पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांना द्यावा. त्यांना ऐतिहासिक किल्ले दाखवा, बागेत न्या, गोष्टी सांगा. झाडांची प्रत्येक फुलं वेगळी असतात, तसेच प्रत्येक मुलंही वेगळी असतात.



टेंडर हार्ट्स स्कूलमध्ये मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन डॉ. अरविंद गायकवाड यांनी केले.



यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, नाटक, शिवराज्याभिषेक सोहळा, अंधश्रद्धा निर्मूलन, कराटे, लाठी-काठी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.



यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. कु.आर्वी बोरुडे, वेदराज साळुंखे, देवांश सुराणा, आदे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या