बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये जळगावला स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड येथील वेदश्री देवेन्द्र बोडखे या विद्यार्थिनींने प्राप्त केले सिल्वर मेडल !
येथील कै.राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड या शाळेतील विद्यार्थिनींनी जळगा़व येथे नुकत्याच झालेल्या महागेम महाराष्ट्राज फर्स्ट इंटरस्कूल बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये
कुमारी वेदश्री देवेन्द्र बोडखे हिने प्राप्त केले सिल्वर मेडल व कुमारी परिधी योगेश ठाकरे हिने कांस्यपदक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. कुमारी वेदश्री देवेन्द्र बोडखे व कुमारी परिधी योगेश ठाकरे हिचे सर्वत्र कौतुक आणी अभिनंदन होत आहे .
जळगांव येथे १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यशस्वी झालेले विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व प्रशिक्षक विश्वास पवार,राम पांडे व शाळेच्या क्रीडा शिक्षिका कुमारी निकिता गायकवाड यांना देतात.
त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनीत कुमार दुबे, उपमुख्याध्यापिका रिया तिडके, शैक्षणिक समन्वयक रुपाली काळे, प्रशासन अधिकारी सुशील उघडे, क्रिडा शिक्षक निलेश विधाते, अमित गौतम तसेच सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वृत विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर
(वरुड जि.अमरावती)
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com