खाटीक गल्ली आणि कुरेशी गल्लीतील बंद घरांमध्ये सुरु असलेले कत्तलखाने उद्ध्वस्त
शेवगाव | शेवगाव शहरात अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून खाटीक गल्ली व कुरेशी गल्ली परिसरात सुरु असलेले गुप्त कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने बंद घरांमध्ये चालणारे कत्तलखाने जमीनदोस्त केले. तसेच, पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन आरोपी फरार आहेत. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
🔹 छाप्यात उघडकीस आलेली माहिती
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. खाटीक गल्लीतील तीन ठिकाणी व कुरेशी गल्लीतील घरांमध्ये अवैध कत्तलखाने सुरु असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत अन्वर शेख अन्वर मोहम्मद, वाहीद हरुन कुरेशी आणि हमजा वाहीद कुरेशी हे इसम गोमांस विक्री करताना आढळून आले.
🔹 जप्ती व अटक
-
जप्त मुद्देमाल: अंदाजे पावणे चार लाख रुपये किमतीचा
-
अटक आरोपी:
वाहीद हरुन कुरेशी (वय 48) हमजा वाहिद कुरेशी (वय 27)
- फरार आरोपी:शाकिब बबु कुरेशी अन्वर मोहम्मद शेख
🔹 उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली.
कारवाईत पोसई आजिनाथ कोठाळे, पोहेकाँ चंद्रकांत कुसारे, पोकाँ शाम गुंजाळ, पोकाँ राहुल आठरे, पोकाँ आदिनाथ शिरसाठ, पोकाँ मारोती पाखरे, पोकाँ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ रोहीत पालवे, पोकाँ नवनाथ कोठे, मपोहेकाँ गितांजली पाथरकर यांनी सहभाग घेतला.
🔹 जप्त गोमांसाची तपासणी
जप्त करण्यात आलेल्या गोमांसातील काही नमुने केमिकल तपासणीसाठी राखून ठेवले असून उर्वरित गोमांसाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com