Shrirampur Police | श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जागतिक माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा !
श्रीरामपूर ( प्रतिनिधी) |
दिनांक २८ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जागतिक माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी नागरिकांना शासन व सार्वजनिक यंत्रणाकडून माहिती मिळवण्याचा अधिकार हा लोकशाहीतील मूलभूत हक्क आहे याची जाणीव करून देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे, या दिवसाचे औचित्य साधून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्यावतीने माहिती अधिकार कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती मोहीम व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी शासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्यात माहिती अधिकाराचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
युनेस्कोच्या पुढाराकारातून सन २०१५ मध्ये या दिवसाला जागतिक मान्यता मिळाली तर सन २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने याला अधिकृत आंतरराष्ट्रीय दिवसाचा दर्जा दिला भारतामध्ये माहिती अधिकार कायदा २००५ लागू झाल्यानंतर नागरिकांना शासन निर्णय, योजना निधीचा वापर आणि विविध शासकीय कामकाजाबाबत माहिती मागण्याचा कायदेशीर मार्ग खुला झाला या कायद्यामुळे अनेक गैरव्यवहार उघडकीस आले असून नागरिकांचा शासनावर विश्वास अधिकृत झाला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकाराचा सजगपणे वापर करावा असे परिसंवादामध्ये ऍडवोकेट सौ.पंधारे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना केले.
याप्रसंगी माजी सैनिक संघर्ष समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर कृष्णा सरदार म्हणाले की,अनेक ठिकाणी या कायद्याचा गैरवापर केला जातो आहे त्याविषयी शासन व प्रशासनाने उपाय योजना केल्या पाहिजेत आणि कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी हे देखील माहिती अधिकाराबाबत अनभिज्ञ आहेत त्यामुळे असे परिसंवाद आणि कार्यशाळा सातत्याने घेतल्या गेल्या पाहिजेत म्हणजे अधिकारी कर्मचारी यांच्यामधील माहिती अधिकाराची भीती नाहीशी होऊ शकते,
मेजर संग्रामजीत यादव म्हणाले की २५% लोकांचे घर हे माहिती अधिकाराच्या अर्जावर चालतात, यावर कुठेतरी बंधन घातली गेली पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास सर्वश्री डीवायएसपी जयदत्त भवंर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, माजी सैनिक संघर्ष समितीचे मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब बनकर , संग्रामजीत यादव ,अशोक कायगुडे, संपत लगड , बाळासाहेब भागडे ,रमेश माळी, शरद तांबे ,मीनानाथ गुलदगड ,भगीरथ पवार , सतिश सांडभोर , माजी पोलीस संघटनेचे अध्यक्ष संजय भोंडवे, गोरक्षनाथ साबदे, आर जी शिंदे, श्री. पठाण, श्री.भोसले इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त : मेजर कृष्णा सरदार
वृत्त प्रसिद्धी सहयोग : समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com