Maharashtra News | रामदास कदम यांच्या आरोपांवर शिवसेनेचा पलटवार; अनिल परब यांचे प्रत्युत्तर
मुंबई | शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर शिवसेनेचे सचिव अनिल परब यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट सवाल उपस्थित केला की “उद्धव ठाकरे इतके वाईट होते, तर मग रामदास कदम यांनी मंत्रीपद का स्वीकारले? मुलाला आमदारकी का दिली?”
परब म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर १४-१५ वर्षांनी कदम बोलू लागले. “२०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन झाले आणि २०१४ मध्ये रामदास कदम मंत्री झाले. तेव्हा उद्धव ठाकरे वाईट वाटले नाहीत का? जोपर्यंत सत्तेतून फायदा होत होता तोपर्यंत सर्व ठीक, आता आरोप का?” असा प्रश्न त्यांनी केला.
अनिल परब यांनी स्पष्ट केले की, “रामदास कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूची चौकशी व्हावी. त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. या आरोपांवर आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू आणि त्या दाव्यातून मिळणारी रक्कम पूरग्रस्तांना देऊ.”
शिवसेनेचे नेते म्हणाले की, बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी आपण उपस्थित होतो. त्यांच्या मृत्यूनंतर जे आरोप कदम करत आहेत ते फोल आहेत. “स्वतःला मराठा स्वाभिमानी म्हणवणारे कदमांनी त्याच वेळी पक्ष सोडायला हवा होता. आज उगाच आरोप करत आहेत,” असे परब यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com