आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना मोफत दिवाळी फराळ व नवीन कपडे वाटप
नगर : दर्शक ।
विकास पालवे,प्रवर अधीक्षक,भारतीय डाक विभाग, अहिल्यानगर यांच्या संकल्पनेतून व विकास पालवे मित्र परिवार,ग्रामीण डीवायएसपी शिरीष वामने,तहसीलदार स्वप्निल ढवळे,उद्योगपती अक्षय चव्हाण,बुधवंत साहेब,विकास पालवे साहेब मित्र परिवाराने नगर मध्ये २ दिवस आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना त्यांच्या घरी जौईं मोफत फराळ वाटपाचे आयोजन केले
अहिल्या नगर शहरा लगतच्या भिंगार इंदिरानगर वसाहत,संभाजीनगर रोड फुटपाथ वर राहणारे सर्व लोक वस्ती, नगर कल्याण रोडवरील श्रमिक बालाजी मंदिरा जवळ लोक वस्ती,जामखेड रोडवरील वस्ती,तारकपूर स्टॅन्ड रोडवरील बस स्टँड जवळील फुटपाथ वरील लोक यांना व अनेक वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन गोरगरीब कुटुंबियांना प्रत्येक घरामध्ये दिवाळी फराळ किट व लहान बालकांना मोफत कपडे व अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव.हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे.घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे,दागिने,फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात.पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत.त्यांच्या घरात सणादिवशी चूल देखील पेटत नाही.ही गोष्ट लक्षात आल्यावर विकास पालवे यांनी आपल्या सहकारी सोबत घेऊन घरोघरी जाऊन गोर गरिबांना तसेच गरजू मुलांना नविन कपडे व दिवाळी निमित्त मोफत फराळ देण्याचा निर्णय घेतला.
सदर उपक्रममध्ये मानसी प्रत्येकी ६ किलोची एक किट प्रमाणे 200 किटचे वाटप करण्यात आले.ज्यामध्ये
प्रत्येकी साखर,तांदूळ,डाळ,तेल,
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता अहिल्यानगरचे भारतीय डाक विभागाचे प्रवर अधीक्षक विकास पालवे,आयपीएस अधिकारी व मित्र परिवाराने सहकार्य केले वैभव अनवडे,पंढरीनाथ गाढवे,शैलेश रा
श्री पालवे व डीवायएसपी शिरीष वामने यांनी उपस्थित सर्वांना फराळा सोबत दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com