सौ.शालिनी व मनसुख वाबळे यांच्यावतीने पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी मिठाई
नगर-दिवाळी सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मनसुख वाबळे व सौ.शालिनी वाबळे यांच्यावतीने गरजू नागरिकांना तसेच पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट व मिठाई वाटप करण्यात आले. या उपक्रमाला सावेडी परिसरातील मान्यवर नागरिक,स्वयंसेवक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि लक्ष्मीपूजनाने झाली. त्यानंतर उपस्थितांना गोडधोड मिठाई व दिवाळी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान आनंद आणि ऊबदार वातावरण निर्माण झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनसुख वाबळे म्हणाले, “दिवाळी हा फक्त दिव्यांचा सण नाही, तर आनंद वाटण्याचा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच आमचे खरे समाधान आहे. लहानसे का होईना, पण या उपक्रमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रसंगी सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com