Nandurbar News | इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने गुलाब पुष्प देऊन हिंदू बांधवांना विजया दशमीच्या शुभेच्छा !

नंदुरबार (प्रतिनिधी) |
येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन आणि सदा जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देवून विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
इस्लाम धर्माचे आखरी नबी हजरत मोहम्मद पैगंबर साहब हे सर्व जगाचे आदर्श होते. त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे. सर्व धर्मियांचा आदर व सन्मान करावा, अश्या त्यांच्या शिकवणीमुळे विजयादशमी (दसरा) या सणानिमित्त सामाजिक कार्यकर्ते एजाजभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली येथील नेहरु चौकातील दत्त मंदिरात हिंदू बांधवांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नंदुरबार तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाजी चौधरी, गुजर नाभिक समाजाचे विभागीय अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे, डॉ.सुनिल गावीत, जयदिप कुमार, पंकज सिंग, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंपी, श्रावण तडवी आदी उपस्थित होते.
यावेळी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाजभाई बागवान आपल्या मनोगतात म्हणाले की, आमच्या संस्थेचा उद्देश संपूर्ण भारतात राष्ट्रीय एकात्मता व बंधुता तसेच सर्व धर्माचा आदर सन्मान व सर्व सणात सर्वांनी सहभागी होवून सर्वांना शुभेच्छा देणे हा आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदा जनसेवा फाऊंडशनचे राज्य उपाध्यक्ष ऍड.मजहर शेख, नंदुरबार बागवान समाजाचे सचिव नासीर इब्राहीम बागवान, मन्यार समाजाचे उपाध्यक्ष अब्दुल नासीर, ऑल इंडीया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे शहर उपाध्यक्ष अजीम बागवान, अशपाक शाह, जिल्हा संघटक छन्नू शाह पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव दानिश बागवान यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com