डॉ.कमर सुरुर यांना राष्ट्रीय चर्चासत्राचे भोपाल येथे निमंत्रण
नगर - उर्दू साहित्याच्या प्रचारात आणि महिला लेखकांच्या प्रतिनिधित्वात सक्रिय भूमिका बजावणारी "बनात" आंतरराष्ट्रीय महिला साहित्य संघटना, दिल्ली, मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आपला नववा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे.
हा विशेष कार्यक्रम "बाब-उल-इल्म पब्लिकेशन्स" च्या सहकार्याने आयोजित केला आहे.
यामध्ये नगर येथील प्रसिद्ध कवयित्री, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका डॉ कमर सुरुर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ते या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भोपाल येथे रवाना झाली आहे.
डॉ कमर सुरुर"उर्दू साहित्यातील स्त्रीवादी विचार आणि वर्तमान काळाच्या आवश्यकता" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि अखिल भारतीय मुशायरामध्ये नगरचे प्रतिनिधित्व करतील. देशभरातील प्रमुख साहित्यिक या शैक्षणिक आणि साहित्यिक बैठकीत सहभागी होणार आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com