Snehalay School | स्नेहालय इंग्लिश स्कूलला मानाचा मुजरा.. नॅशनल रायटर्स वर्कशॉपच्या अंतिम फेरीत दोन विद्यार्थिनींची निवड

  Snehalay School |  स्नेहालय इंग्लिश स्कूलला Snehalay School |  मानाचा मुजरा.. नॅशनल रायटर्स वर्कशॉपच्या अंतिम फेरीत दोन विद्यार्थिनींची निवड

Snehalay School | स्नेहालय इंग्लिश स्कूलला मानाचा मुजरा.. नॅशनल रायटर्स वर्कशॉपच्या अंतिम फेरीत दोन विद्यार्थिनींची निवड



नगर : दर्शक । 


नगर येथील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलने हिंदी साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे. शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी फातिमा जावेद शेख आणि इयत्ता नववीची विद्यार्थिनी तमन्ना गुप्ता यांची ग्रँड फिनाले नॅशनल रायटर्स वर्कशॉपच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.





या प्रतिष्ठित वर्कशॉपसाठी देशभरातून सहभागी झालेल्या ७६२ विद्यार्थ्यांमधून २२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, हा कार्यक्रम २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे. या यशामध्ये गौरवाची बाब म्हणजे अहिल्यानगरमधील स्नेहालय या सामाजिक संस्थेअंतर्गत चालणाऱ्या स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.





या दोन्ही विद्यार्थिनी आपल्या मार्गदर्शिका यास्मिन सय्यद यांच्यासोबत चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन हिंदी लेखन कौशल्याचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेणार आहेत.
विद्यार्थिनींना मिळालेल्या या घवघवीत यशासाठी स्नेहालय संस्थाच्या अनिवासी प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख, प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री खरात तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.





या यशाबद्दल स्नेहालय संस्थाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे आणि संस्था प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या