Rahuri Election | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचा मीच उमेदवार – प्रा. अमोल खाडे

 Rahuri Election | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचा मीच उमेदवार – प्रा. अमोल खाडे

Rahuri Election | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचा मीच उमेदवार – प्रा. अमोल खाडे






 Rahuri Election | नगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते प्रा. अमोल खाडे यांनी आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा ठाम दावा केला आहे. याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे औपचारिकरित्या उमेदवारीची मागणी नोंदवली आहे. पहिल्याच दिवशी नामनिर्देशन पत्र विक्री सुरू होताच खाडे यांनी चार अर्ज खरेदी करून आपल्या तयारीचे संकेत दिले.



        प्रा. खाडे हे पक्षाचे प्रामाणिक, निष्ठावंत व दीर्घकाळ कार्यरत असलेले कार्यकर्ते असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी मतदारसंघात ओबीसी समाजाचे निर्णायक मतदान असल्याने या समाजाचे प्रतिनिधित्व करणारा सक्षम उमेदवार देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून गेली अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी द्यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




तसेच, प्रस्थापित राजकारणाला पर्याय देण्याची वेळ आली असून जनतेच्या प्रश्नांवर थेट लढा देण्याची तयारी असल्याचे खाडे यांनी स्पष्ट केले. “सामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी व युवकांचे प्रश्न यावर ठोस भूमिका घेऊन निवडणूक लढवणार आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रस्थापितांच्या विरोधात पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



       दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवार पुढे येत असल्याने निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अधिकृत उमेदवार कोण ठरणार याकडे कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم