Savedi | सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे व्याख्यानाचे आयोजन
Savedi | नगर : दर्शक ।
अन्न, वस्त्र, निवारा या जशा मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन ही सुद्धा काळाची मूलभूत गरज आहे. भविष्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, आज प्रत्येकाने पैशाची नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्चाचे तसेच वेळेचे नियोजन असणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन आर्थिक सल्लागार व ग्राहक पंचायतीचे सदस्य आदित्य चांदेकर यांनी केले.
सावेडी जेष्ठ नागरिक मंच आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्प समजून घेताना आणि मृत्युपत्रा ची गरज या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ग्राहक पंचायत संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर,कोषप्रमुख कृष्णराव बागडे, राजेंद्र कळमकर, ॲड.सिद्धार्थ वाघमारे, पंचायतचे उपाध्यक्ष दत्तात्रय सोनार मंच चे कार्यवाहक ज्योतीताई केसकर, एस आर जोशी, बलभीम पांडव, बाजीराव जाधव, मनोहर केसकर, हरिश्चंद्र थिगळे, पुष्पा चितांबर, शिरीष कुलकर्णी, वैशाली भणगे उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाचे आज बँकेमधील खाते हे जॉईंट स्वरूपाचे असावे. आपल्या इच्छेने मृत्युपत्र सर्वांनी रजिस्टर पद्धतीने तयार करून ठेवावे. तसेच पेन्शनर लोकांनी आपल्या नातवंडांच्या शिक्षणासाठी पैसे योग्य तेथे गुंतवावे. राष्ट्रीयकृत बँकेत आपला आर्थिक व्यवहार असावा व त्यामध्येच आपल्या डिपॉझिट खाते असावे.
अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर म्हणाले की, ग्राहक हा देव असतो. आपण सर्वजण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत ग्राहकच असतो. बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकाचे अत्यंत सोपी व्याख्या केली आहे. ग्राहक नेहमी सजग राहिला पाहिजे.
मंचच्यावतीने आदित्य चांदेकर व गजेंद्र क्षीरसागर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शलाका रसाळ यांनी केले. तर आभार पुष्पा चितांबर यांनी मानले.
.webp)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com