Sonar Samaj |  श्री मैढ़ क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशची बैठक संपन्न 

Sonar Samaj |  श्री मैढ़ क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशची बैठक संपन्न



           नगर-श्री मैढ़ क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक नगरमध्ये संपन्न झाली,यावेळी श्री मैढ़ क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हरिषजी खजवाणिया,सचिव भरत खजवानीया,उपाध्यक्ष अनिल कडेल,सहसचिव संदीप  खजवानीयाखजिनदार राजकुमार अग्रोया ,सहखजिनदार कमलकिशोर बदलीया यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधी उपस्थित होते



 

          आलेल्या प्रतिनिधींचे श्री मैढ़ क्षत्रिय सोनार समाज अहिल्यानगर चे अध्यक्ष अध्यक्ष श्री श्रीकीसनजी मिरांडे,युवा मंच अध्यक्ष व भाजपा शहर जिला उपाध्यक्ष श्री गोपाल वर्मा,श्री मदनलालजी मिरांडेश्री कांतिलालजी जवडाश्री ओमप्रकाश सहदेव,श्री भरत वर्माश्री अशोक धुप्पडश्री कन्हैयालाल वर्माश्री गोपीकीसन वर्माइ त्यांचे स्वागत करून सत्कार केले 




              समाजाच्या निवडणुका ७ वर्षानंतर पुणे येथे झाल्या,नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.त्यानंतर नगर मधील ही पहिलीच बैठक होती व समाजातील जनजागृतीसाठी राज्यात  दौरा सुरु करण्यात आला,त्यानंतर राज्यातील प्रत्येक ठिकाणी समाजाचे पदाधिकाऱ्यांचे निवड किंवा निवडणुका घेण्यात येणार आहेत,यावेळी राज्य पदाधिकाऱ्यांचे अहिल्यानगर समाजाच्या वतीने सर्वांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला




           या बैठकीत  खालील ठराव करण्यात आली समाजामध्ये लग्नापूर्वी परिवेडींग फोटोशूट करू नये तसेच लग्नामध्ये जेवणासाठी ५० पदार्थ न करता कमीत कमी पदार्थ करावे ,समाजातील जे परिस्थितीने कुमकुवत  मुले आहेत त्यांना शिक्षणासाठी व उद्योग व्यवसायासाठी मदत करणे,कोणी मयत झाले तर त्याचा विधीचा कार्यक्रम मोठा न करता छोट्या स्वरूपात करावा  आदी ठराव करण्यात आले 




           श्री मैढ़ क्षत्रिय सोनार समाज अहिल्यानगरने बैठकीचे सर्व नियोजन उत्तम प्रकारे केले होते प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले