संस्कृत विषयात 100 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

पोळ संस्कृत क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश






नगर : दर्शक । 
अंबिकानगर, केडगाव येथील पोळ संस्कृत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत संस्कृत विषयात उल्लेखनीय यश संपादन करत क्लासेसच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी क्लासचा निकाल शंभर टक्के लागला असून, अकरा विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 90 पेक्षा अधिक गुण मिळवत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही सरासरी 85 ते 90 गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे गुण 80 च्या पुढे राहिल्याने संपूर्ण निकाल कौतुकास्पद ठरला आहे.



           संस्थेच्या संचालिका प्रा. प्रियंका अभिजीत पोळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, संस्कृत हा स्कोअरिंग विषय असला तरी त्यासाठी योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक असतो. गेल्या 16 वर्षांपासून पोळ संस्कृत क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जात असून, दरवर्षी विद्यार्थी उत्तम यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.



या यशाबद्दल संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पालक, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



         संस्कृत विषयात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का चव्हाण हिने 98 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम ढोले याने 97 गुण, राज खाकाळ व गौरव जाधव यांनी प्रत्येकी 96 गुण, देवांश्री मोहिते हिने 95 गुण मिळवले. तसेच प्रथमेश सांगळे, तृप्ती जपे, तुषार बारगजे आणि श्लोक वाळुंज यांनी प्रत्येकी 94 गुण मिळवले. पुष्कर लोळगे याला 91 तर नेहा लेहाने हिला 90 गुण प्राप्त झाले. अवधूत जेजूरकर याने 89 गुण मिळवत विशेष यश मिळवले.




           याशिवाय प्रांजल काळे, अवधूत धर्माधिकारी, निमिषा कांबळे, रुद्र गांधी, हर्षदा येवले, प्रणव वाबळे, अथर्व ननावरे, अमन लोखंडे, कृष्णा निमसे, सिद्धार्थ पाठक, मतिन पठाण, शुभम लेहाने आणि पार्थ अडोळकर आदी विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.



         दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पोळ संस्कृत क्लासेसमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी पोळ क्लासेस, छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयाजवळ, अंबिकानगर, केडगाव, अहिल्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.