हजरत सय्यद अहमदशहा अकबरशाह (रहे.) उर्फ कोळगाववाले बाबा यांचा संदल व ऊरुस

Kolgao | कोळगाववाले बाबा यांचा संदल व ऊरुस


नगर


सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद अहमदशहा अकबरशाह (रहे.) उर्फ कोळगाववाले बाबा यांचा संदल व ऊरुस दरवर्षीप्रमाणे यावर्षी दि. 3 व 4 जून रोजी होत आहे.


बुधवार दि. 3 जून रोजी संदल व गुरुवारी दि. 4 रोजी ऊरुस होत आहे. यानिमित्त 4 जूनला रात्री 9 वा. मशहूर कव्वाल हैदर नाजा व तौसिफ जुनैदी यांच्या सुश्राव्य कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. 





याच दिवशी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कोळगाववाले बाबा ऊरुस समितीतर्फे करण्यात आले आहे.


कोळगाववाले बाबा यांच्या संदल व ऊरुस आणि कव्वाली व महाप्रसाद अशा सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्वधर्मिय भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोळगाववाले बाबा ऊरुस समितीतर्फे करण्यात आले आहे.