आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी समर्पित निरंकारी मिशनचा योग दिन

आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी समर्पित निरंकारी मिशनचा योग दिन


नगर : दर्शक । 

 सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रामित जी यांच्या आशीर्वादाने, संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरातील 1500हून अधिक शाखांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग आणि आध्यात्मिक जागृतीवर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले.


          या विषयी अधिक माहिती देताना, मिशनचे अहिल्यानगर विभागीय प्रभारी हरीश खुबचंदानी यांनी सांगितले की, येथील संत निरंकारी मिशनच्या शाखेत योग विद्याधाम चे ज्येष्ठ योगशिक्षक बबनराव बारगळ व गणेश येनगंदुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करण्यात आला,तसेच झोन 36 मधील अनेक शाखां मध्ये सुद्धा योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 



या कार्यक्रमात भक्त, सेवादल स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी सक्रियपणे सहभाग घेतला. अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित योग सत्रात, सहभागींनी योगाभ्यास केला आणि निरोगी व संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची शपथ घेतली.



   सदगुरू माता जी अनेकदा आपल्या विचारांमध्ये "निरोगी मन, सुलभ जीवन" असा उल्लेख करतात आणि स्पष्ट करतात की आपले शरीर हे निरंकार देवाकडून मिळालेली देणगी आहे आणि ते निरोगी ठेवणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. म्हणूनच, दीर्घायुष्य आणि सक्रिय व यशस्वी जीवनासाठी योग अत्यंत आवश्यक आहे.


     निरंकारी मिशनने आयोजित केलेली ही जनकल्याण मोहीम सर्वांगीण कल्याणाचा संदेश देतानाच, निःसंशयपणे समाजाला आरोग्य, जागरूकता आणि सकारात्मक जीवन मूल्यांकडे प्रेरित करते.