घातपाताच्या तयारीत फिरणारा सराईत गुन्हेगार तलवारीसह जेरबंद

घातपाताच्या तयारीत फिरणारा सराईत गुन्हेगार तलवारीसह जेरबंद





नगर- घातपात करण्याच्या उद्देशाने त्याला पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली तलवार घेवून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला तोफखाना पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पकडले आहे. ही कारवाई १२ जून रोजी दुपारी जुना बोल्हेगाव रोड परिसरात करण्यात आली. 



सुमंत ऊर्फ टिंग्या किशोर साळवे (वय २९, रा. निलक्रांती चौक, अहिल्यानगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.तोफखाना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना १२ जून रोजी दुपारी २.३५ च्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, 



आरोपी सुमंत साळवे हा जुना बोल्हेगाव रोडवरील नवीन पुलाजवळ असलेल्या एका लिंबाच्या झाडाजवळ संशयास्पद स्थितीत हातात तलवार घेवून फिरत आहे. ही माहिती मिळताच पथकाने तेथे जावून सापळा लावून असता त्याच्याकडे लोखंडी तलवार आढळली. पोलिसांनी ती जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक भागवत बांगर यांच्या फिर्यादी वरून आरोपी साळवे याच्या विरुद्ध आर्म क्ट ४ / २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




ही कारवाई पो. नि. बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस अंमलदार अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिश त्रिभुवन, सुजय हिवाळे, भागवत बांगर, सतिश शिंदे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड, राहुल गुंडू, नितीन शिंदे, अरुण सांगळे, महिला पो.ना. जिजाबाई खुडे यांच्या पथकाने केली.

x