पाथर्डीच्या मढी शिवारातून ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर - शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादातुन सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव रावजी गावडे (वय ७५, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा) यांचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन निर्घुण खुन करून पसार झालेला आरोपी विलास दादा गावडे (वय ५५, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांत पकडले आहे. सदर आरोपी हा पाथर्डी तालुक्यातील मढी शिवारात लपून बसला होता.
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. हरिष भोये यांनी उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे, परिविक्षाधीन उपनिरीक्षक पुष्कर कडु, सचिन भाबड, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, गणेश धोत्रे, फुरकान शेख,
शाम जाधव, मनोज साखरे, भगवान थोरात, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, उत्तरेश्वर मोराळे, चंद्रकांत कुसळक यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करुन समांतर तपास सुरु केला.
ही पथके १२ जून रोजी आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा पोलीसांना चकवा देण्यासाठी आपले अस्तित्व लपवुन मढी, मायंबा शिवार, ता. पाथर्डी परिसरामध्ये लपुन बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे तात्काळ मढी गड परिसरामध्ये अत्यंत गोपनियतेने शोधमोहिम राबवुन आरोपी विलास गावडे यास मढी गडावरुन शिताफिने ताब्यात घेतले आहे.
ताब्यातील आरोपीस वर नमुद गुन्ह्याचे तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com