सावित्रीबाई फुले उर्दू  शाळेत विद्यार्थिनींचे पुष्प देऊन स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वाटप

सावित्रीबाई फुले उर्दू  शाळेत विद्यार्थिनींचे पुष्प देऊन स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वाटप





नगर : दर्शक । 
नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन स्वप्नांचा, नवीन संकल्पांचा आणि नवीन यशाचा प्रारंभ आहे. शिक्षण हेच असे साधन आहे जे माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. त्यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.तुमच्या हातात आज मिळालेली पाठ्यपुस्तके ही केवळ पुस्तके नसून तुमच्या उज्ज्वल भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहेत. नियमित अभ्यास, शिक्षकांचा आदर, वेळेचे नियोजन आणि मेहनत या चार गोष्टी तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवू शकतात.असे प्रतिपादन प्रा.डाॅं.अब्दुस सलाम यांनी केले.





मुकुंदनगर येथील मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले.





कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक प्रा.डॉ.अब्दुस सलाम होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान,हसीब शेख,फरीदा भाभी, अजीज सर, मुख्याध्यापक सय्यद नौशाद अहमद, शेख फरजाना दिलावर, शेख असलम, युसुफ पटेल, शेख शाहीन मोहम्मद इसाक, शेख हिना अब्दुल कुद्दुस, शेख सुलताना अब्दुल लतीफ,फरहा बाजी, अमरीन बाजी आदी मान्यवर उपस्थित होते.



मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात होत असल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सुलताना यांनी केले. मुख्याध्यापक सय्यद नौशाद अहमद यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तर आभार प्रदर्शन असलम पटेल यांनी केले.