वर्धापन दिनी विशेष मुलांसोबत आनंदाचे क्षण ; ठाकरे शिवसेनेतर्फे अनाम प्रेममध्ये मिष्टान्न भोजन  

ऐंशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण हीच शिवसेनेची शिकवण : किरण काळे









नगर | प्रतिनिधी

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे शिवसेना, अहिल्यानगर शहराच्या वतीने अंध, अपंग आणि विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या स्नेहालय प्रणित अनाम प्रेम या संस्थेतील मुलां समवेत मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी या मुलांसोबत प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे क्षण अनुभवत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मी शिवसेनेची शिकवण आहे. हा समाजसेवेचा वसा अविरतपणे जपण्याचे काम शिवसैनिक करत राहतील, असे प्रतिपादन यावेळी बोलताना महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले. 



यावेळी संजय झिंजे, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक आघाडीचे अनिस चुडीवाला, कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, राम वाणी, राम झिने, चंद्रकांत उजागरे, महिला आघाडीच्या उषा भगत, शारदा वाघमारे, मीना घाटगे, शैला लांडे, विकेश गुंदेचा, सागर चाबुकस्वार, सचिन नवघिरे, बाळासाहेब जरे, सुजय लांडे, ऋतुराज आमले, शंकर आव्हाड, गणेश आपरे, राम धोत्रे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, विजय शिरसाट, स्वप्निल साठे, महावीर मुथा, किशोर कोतकर, आप्पा लांडगे, विनोद शिरसाट, बाबासाहेब वैरागर, जयराम आखाडे, धनंजय देशमुख आदींसह शिवसैनिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



याप्रसंगी बोलताना काळे म्हणाले, हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना केवळ राजकारण नव्हे, तर समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे संस्कार दिले आहेत. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून या विशेष मुलांसोबत काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, हे आमच्यासाठी समाधान देणारे आहे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, हीच आमच्या वर्धापन दिनाची खरी भेट आहे. 


यावेळी मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. उपस्थित शिवसैनिकांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्यासोबत आपुलकीचे क्षण व्यतीत केले. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रेम आणि माणुसकीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सातत्याने केला जाईल, अशी भावना यावेळी काळे यांनी व्यक्त आली. कार्यक्रमास शिवसैनिकांसह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.