व्यावसायिकाला तारकपूर येथे हॉटेल लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
व्यावसायिकाला तारकपूर येथे हॉटेल लाकडी दांडक्याने बेदम मारहाण नगर शहरातील तारकपूर भागातील सिंधी कॉलनी येथे महानगरपालिकेने केलेल्या सिमेंट रस्त्याच्या पाण्याचा उतार आपल्या घराच्या जवळ काढल्याचा राग मनात धरून दोन व्यक्तींनी एका हॉटेल व्यावसायिकाला आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना २० जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जगजीतसिंग किशनसिंग गंभीर ( वय ५३, रा. सिंधी कॉलनी, तारकपूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २० जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर उभे होते. त्याच वेळी तिथे राहणारे विकी कुकरेजा आणि नरेंद्र छाबरिया हे दोघे फिर्यादी यांच्या जवळ आले.
महानगरपालिकेने तयार केलेल्या सिमेंट सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या विकी कुकरेजा याने जगजीतसिंग गंभीर यांना लाकडी दांडक्याने दोन्ही हातांवर बेदम मारहाण करून जखमी केले. याच दरम्यान फिर्यादीचा मुलगा सोनू गंभीर हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आला असता, दुसरा आरोपी नरेंद्र छाबरिया याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची दमदाटी केली.
या घटनेनंतर जखमी फिर्यादी यांना उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जगजीतसिंग गंभीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी विकी कुकरेजा आणि नरेंद्र छाबरिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काढला, असा जाब विचारत त्यांनी वाद घालण्यास पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत. रस्त्याच्या पाण्याचा उतार माझ्या घराजवळ का

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com