जिल्ह्यातील ५८ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या तीन पोलीस निरीक्षक, २१ सपोनि तर ३४ उपनिरीक्षकांचा समावेश
अहिल्यानगर - जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांसह ५८ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर ३४ उपनिरीक्षकांचा समावेश आहे दिनांक २१ रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली.
बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव उपस्थित होते. बैठकीत नमूद पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या नेमणुका करण्याविषयी चर्चा झाली.
त्याप्रमाणे बदल्यांबाबत व नेमणुकांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून जनहितार्थ, कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकडीनुसार व विनंतीनुसार सन २०१५ च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न चे पोटकलम (१) व (२) तसेच त्या खालील सुधारित स्पष्टीकरणानुसार, तसेच सक्षम प्राधिकारी म्हणुन जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन,
जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने ५८ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती बदल्या केल्या आहेत. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ यांची दंगल विरोधी पथकात नेमणूक करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक विजय पुंडलिकराव देशमुख यांची जिल्हा विशेष शाखेत तर जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची पोलीस नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com