साईबन मधील लालभडक गुलमोहर झाडाची रांग पर्यटकांना आकर्षण
.
नगर- गुलमोहर वृक्षाची असंख्य झाडे साईबनमध्ये असून हा फुललेला गुलमोहर येणाऱ्यां लोकांचे आकर्षण ठरत आहे,गुलमोहर हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे.याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असे नाव आहे.गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हा
नगरमधील शिर्डी रोडवरील नागापूर एमआयडीसी च्या मागे असणार्या साईबन कृषी पर्यटन केंद्रात उन्हाळ्याची सुट्टी संपत आल्यामुळे अनेक जण सहकुटुंब व ग्रुपने येत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, निसर्गरम्य असणारे वातावरण तसेच झाडी व शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न राहते.येथे येणाऱ्या लोकांचे सध्या लालभडक गुलमोहर आकर्षण ठरत आहे.
गुलमोहर हे झाड जगभरात निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीत बहरताना दिसत.समुद्रकिनारी असोत वा समुद्रसपाटीपासुन ह्जारो फूट उंचीपर्यंतचा डोंगराळ भाग असो तिथे दिसतो,लोकांचे निसर्ग आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यांकडे लक्ष वेधावे म्हणून आकर्षक अशा फुलांनी बहरलेला गुलमोहर प्रातिनिधिक वृक्ष समजला जातो,
जमिनीकडे झेपावणाऱ्या फांद्यांमुळे गुलमोहराचा छत्रीसारखा घुमट तयार होतो. मे महिन्यात त्याला फुले येतात,गुलमोहोराच्या वैशिष्ट्यपूर्ण पाच लाल-केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात अन् त्यामुळे या फुलाचे सौंदर्य अधिकच खुलते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com