प्रा. रागिनी कदम-टेकाळे यांना हिंदी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान

प्रा. रागिनी कदम-टेकाळे यांना हिंदी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान


        


नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ । 

 देवळाली प्रवरा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात हिंदी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या रागिनी कदम-टेकाळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून हिंदी विषयातील "इक्कीसवीं सदी के हिंदी उपन्यास : संवेदना के विविध आयाम" या विषयावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.



             त्यांनी हे संशोधनकार्य न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथील संशोधन केंद्रातून पूर्ण केले. हे संशोधन कार्य प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील सहयोगी प्राध्यापक व हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. 


संशोधन प्रक्रियेदरम्यान संशोधन केंद्रप्रमुख डॉ. हनुमंत जगताप, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. सुनीता मोटे तसेच राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती हापसे आणि महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.



          त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र दरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, श्री. मनोज कदम, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच देवळाली प्रवरा शहर परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.