मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या गीतांची महफील एक दिल दो आवाज चे २४ जुलैला आयोजन
नगर : दर्शक ।
एस.के. मेलडी सिंगर्स ग्रुपच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन अजरामर पार्श्वगायक मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या गाजलेल्या गीतांची बहारदार मैफल 'एक दिल दो आवाज' या विशेष कार्यक्रम शुक्रवार २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात होणार असल्याची माहिती आयोजक समीर खान आणि किरण उजागरे यांनी दिली.
या संगीतमय कार्यक्रमात किरण उजागरे, पवन फिरोदिया, सारंग पंधाडे, इस्थर पवार, मोहसीन सैफी, नेहा ओस्तवाल आणि समीर खान हे गायक-गायिका रफी आणि किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करणार असुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता सावेडकर करणार आहेत.
लाईव्ह ऑर्केस्ट्रासह रंगणाऱ्या या कार्यक्रमासाठी संगीत संयोजनाची धुरा निलेश सोज्वळ (ऑक्टोपॅड - नगर), अमान सय्यद (कीबोर्ड - पुणे), एडवीन पेरेपाडम (कीबोर्ड - मुंबई), संकेत शेलार (ड्रम्स - मुंबई), अमित बरुवा (गिटार - नगर), अमित साळवे (ढोलक/काँगो - नगर) आणि सिद्धांत गायकवाड (ढोलक/तबला - नगर) हे सांभाळणार आहेत. तर ध्वनी व प्रकाश व्यवस्था हरमन,प्रो ऑडिओ अँड लाईट्स, श्रीरामपूर यांच्याकडून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अहिल्यानगर शहरात मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या गीतांचा संयुक्त लाईव्ह शो सादर करणारा हा पहिलाच ग्रुप असल्याचे आयोजकांनी सांगितले. या दोन्ही महान गायकांचे चाहते देश-विदेशात मोठ्या संख्येने असून, अहिल्यानगरमध्येही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे संगीतप्रेमींनी हा अनोखा कार्यक्रम आवर्जून उपस्थित राहून आपल्या आवडत्या गीतांचा आनंद घ्यावा आणि दैनंदिन धकाधकीतून काही क्षण तणावमुक्त (Stress-free) वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजकांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सभागृहात अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली होती. यंदाही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतील, असा विश्वास असून त्यानुसार आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून, प्रेक्षकांनी सायंकाळी ६ वाजता वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवेदिका डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी केले आहे.
मोफत प्रवेशिके साठी सावेडी ९७३०६८६९७६ / ७०२०६८१४२२
तेलखुंट व नगर परिसर ९८९०११७१९६
कायनेटिक चौक ते केडगाव परिसर ९५६१११४८८८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन किरण उजागरे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com