🗳️ ASDD यादीतील मतदारांनी 16 ऑगस्टपर्यंत नावाची खात्री करावी
📋 गणना प्रपत्र भरून देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन
नगर : दर्शक । दि. 13 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.01 नोव्हेंबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार दि.17 ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन गणना फॉर्म (EF) जमा करणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले आहे. त्यानुसार असंकलित मतदारांची यादी (ASDD- गैरहजर, स्थलांतरीत, मयत, दुबार) अहिल्यानगर जिल्ह्याचे संकेतस्थळ ahilyanagar.nic.in व https://ahilyanagar.maharashtra.gov.in/en/notice/special-intensive-revision-program-2026-asdd-voter-lists/ या लिंकद्वारे उपलब्ध होईल.
📌 ASDD यादी कुठे उपलब्ध?
तसेच सदरची यादी संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनीधी (BLA) यांचेकडेस देखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
प्रसिध्द करण्यात आलेल्या ASDD यादीचे अवलोकन करावे. व त्यामध्ये आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव असल्यास व त्याबाबतचा गणना प्रपत्र/ Enumeration Form स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)/ स्थानिक तहसिल कार्यालय यांचेकडे दि.16 ऑगस्ट 2026 पर्यंत भरुन दिल्यास प्रारुप मतदार यादीत सदर नावाचा समावेश करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.
📝 मतदारांनी काय करावे?
🔹 प्रसिध्द करण्यात आलेल्या ASDD यादीचे अवलोकन करावे.
🔹 आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव यादीत आहे का, याची खात्री करावी.
🔹 नाव असल्यास गणना प्रपत्र (Enumeration Form) भरावे.
🔹 सदर प्रपत्र स्थानिक BLO / तहसिल कार्यालयाकडे दि.16 ऑगस्ट 2026 पर्यंत भरुन द्यावे.
☎️ अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक
याशिवाय अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र.1950 यावर संपर्क केल्यास अशा मतदारांना योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येईल.
तसेच ECINET मधून Book a Call Request चा पर्याय वापरुन BLO शी संपर्क साधल्यास ते आपणास उचित सहकार्य व मार्गदर्शन करतील.
🌐 NGSP द्वारेही करता येणार अर्ज
तसेच NGSP (National Grievence Service Portal) द्वारे यासंदर्भांत दि.16 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केल्यास अशा मतदारांचे नाव प्रारुप मतदार यादीत समावेश करण्याबाबतचा निर्णय स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडून घेण्यात येईल.
⚠️ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन
तरी मयत, दुबार, कायमस्वरुपी स्थलांतरी मतदारांच्या (ASDD) यादीतील मतदारांनी दि.16 ऑगस्ट 2026 पर्यंत वरील पर्यायांचा वापर करुन आपल्या किंवा आपल्या कुटूंबातील सदस्याच्या नावाबाबत खात्री करुन वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
— जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर (@InfoAhilyanagar) August 11, 2026
मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची प्रत्येक नागरिकाने तपासणी करावी, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.@MahaDGIPR @CEO_Maharashtra pic.twitter.com/0FVGZYWQHZ

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com