धीरज हत्याकांडात पोलीस तपासाच लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादीने बी टीम ऍक्टिव्ह केली : किरण काळे
एमआयएमच्या तक्रारीवर ठाकरे शिवसेनेची टीका
धीरजच्या अंत्यविधीपूर्वी डीएसपी चौक येथे झालेल्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सभेतील वक्तव्यांवर कारवाईची मागणी एमआयएमने प्रशासनाकडे केली आहे. त्यावर आता ठाकरे शिवसेनेने टीका केली आहे.
राष्ट्रवादीशी "अर्थ"पूर्ण राजकीय हातमिळवणीचा आरोप
किरण काळे म्हणाले, राष्ट्रवादी आमदारांचे नातेवाईक असणारे आणि त्यांच्याच पाठबळावर राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार झालेले दत्ता पानसरे यांच्या नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूक उमेदवारी अर्जावर सूचक झालेल्या एमआयएमचा पर्दाफाश यापूर्वीच झाला आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता एमआयएम करत आहे, तेव्हा त्यांच्याशीच त्यांनी 'अर्थ'पूर्ण राजकीय हात मिळवणी केली. ते आता राजकीय नौटंकी करत अहिल्यानगर वेठीस धरत आहेत.
मुकुंदनगरमधील प्रचारसभांवरून राष्ट्रवादीवर आरोप
महानगरपालिका निवडणुकीत मुकुंद नगरमध्ये एमआयएम नेते असदोद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील यांच्या प्रचारसभा राष्ट्रवादीच्या स्पॉन्सरशिप वर झाल्या. निवडणुकीच्या राजकारणा करिता मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी ही आऊटडेटेड झालेली स्ट्रॅटेजी त्यांनी वापरणे बंद करावे. ओवेसी, इम्तियाज, जगताप, कर्डिले, पडळकर, भंडारे हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करून अहिल्यानगर आणि महाराष्ट्र जर कोणी पेटवू पाहत असेल तर ते योग्य नाही. आता कुठे वातावरण निवळत असून समाजात शांतता आणि सलोखा असण्याची गरज असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
त्यांचे कॉल डिटेल्स तपासा :
धीरज परदेशी हत्याकांड होण्याच्या काही महिने आधी आणि नंतर एमआयएम, राष्ट्रवादीच्या नेते, महत्त्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही संभाषण झाले आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांचे सीडीआर, एसडीआरसह कॉल डिटेल्स तपासावेत. रात्रीच्या अंधारात भेटी झाल्याच्या देखील चर्चा आहेत. अहिल्यानगर अशांत करण्यासाठी जर कोणी षड्यंत्र रचत असेल तर अशांना पोलीस प्रशासनाने वठणीवर आणावे, अशी किरण काळे यांनी जाहीर मागणी केली आहे.
परदेशी कुटुंबीयांच्या पुनर्वसनावर त्यांचा ब्र नाही :
एसपी ऑफीस चौक सभा महाराष्ट्राने ऐकली. धीरजला न्याय मिळवून देण्यासाठी ती होती की राजकीय पोळी भाजून घेण्याचा आखाडा रंगला होता हेच समजत नव्हते. एकाही वक्त्याने धीरज परदेशीच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी साधा ब्र सुद्धा काढला नाही. मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० लाखांची मदत देण्याची मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. सत्ता हातात असून देखील मदत करण्याच औदार्य दाखवण्यासाठी त्यांची नियत साफ नसल्याशी सरकारवर किरण काळे यांनी टीका केली आहे.
जबरदस्तीने दुकाने बंद करणे चुकीचे :
बुरुडगाव रोड परिसरामध्ये जबरदस्तीने दुकानं बंद करण्यासाठी दुकानदारांना मारहाण करण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये तसा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे ही दुकानं हिंदूंचीच होती. धीरजच्या दुर्दैवी निधना आडून शहरात काही बॅड एलिमेंट जर दहशत माजत असतील तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अधिक कठोर पावले उचलावीत, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com