अल करम हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व उपचार व रक्त तपासण्या शिबिर संपन्न
नगर - आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे.आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळोवेळी आरोग्य तपासणी करून आजाराचे वेळीच निदान करणे अधिक महत्त्वाचे आहे. विशेषतः मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने केले पाहिजे असे प्रतिपादन अल करम हॉस्पिटलचे डॉ जहीर मुजावर यांनी केले.
पैगंबर जयंतीचे औचित्य साधून अल करम हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व उपचार व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली.
तसेच मोफत ब्लड ग्रुप, शुगरसह विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या.
शिबिरामध्ये अल करम हॉस्पिटलचे डॉ.जहीर मुजावर यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेतल्या. तसेच मधुमेह, रक्तदाब व इतर दीर्घकालीन आजारांबाबत रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून आवश्यक आरोग्यविषयक सल्ला दिला.
यावेळी अल करम हॉस्पिटलचे तौफिक तांबोली, हाफीज अर्शद सय्यद, राजीक खान, अकीब सय्यद, शेख उसामा, तौसिफ रेडियमवाला, शेर अली शेख आदी उपस्थित होते.
शिबिराचे सूत्रसंचालन एजाज तांबोली यांनी केले. प्रास्ताविक सरफराज कुरैशी यांनी केले, तर आभार आबीद दुलेखान यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com