राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी अहिल्यानगर वाचनालयाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ग्रंथपालांचा सन्मान




 

नगर : दर्शक । "वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी समाजाची आणि पर्यायाने उगवत्या पिढीची जडणघडण करण्यासाठी ग्रंथालय ही आणि वाचक यांच्यामधील ग्रंथपाल हा महत्त्वपूर्ण दुवा असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. राजा ठाकूर यांनी व्यक्त केले. 




वाचन चळवळीचे प्रणेते डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित " राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी" अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने नगर जिल्ह्यातील विविध वाचनालयातील ग्रंथपालांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते उपस्थित मान्यवरांना संबोधित करत होते. 




        यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, खजिनदार तनवीर खान,सहकार्यवाह राहुल तांबोळी, संचालिका शिल्पा रसाळ , कार्यक्रमाचे संयोजक किरण आगरवाल ,कवी चंद्रकांत पालवे,वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे ,सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल, आदींसह जिल्ह्यातील विविध वाचनालयाचे ग्रंथपाल उपस्थित होते.




        पुढे बोलताना डॉ.राजेंद्र ठाकूर यांनी ग्रंथपाल हे सातत्याने वाचकांची अभिरुची ओळखून ,त्यांची आवड ओळखून त्यांना पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करत असतात. त्यांना आवडणारी पुस्तके त्यांच्या हाती पडली तर निश्चितच वाचकांच्या विचारांच्या कक्षा रुंदावत जातात आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होते. 



त्यामुळे ग्रंथपालाची भूमिका समाजाच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे"  डॉक्टर ठाकूर म्हणाले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संचालिका शिल्पा रसाळ यांनी जिल्हा वाचनालय आणि त्यामधील कर्मचारी सातत्याने हे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करत असलेल्या अमूल्य योगदानाविषयी माहिती दिली.




        कवि चंद्रकांत पालवे यांनी वाचन चळवळीविषयी माहिती देऊन सुजाण वाचकांना  त्यांच्या आवडीची ग्रंथसंपदा उपलब्ध करून देणे त्याविषयी सातत्याने मदत करणे यामुळे वाचकांची पुस्तकांविषयीची ओढ वाढत जाते. खऱ्या अर्थाने ग्रंथपालांची ही भूमिका भविष्यातील सुदृढ समाज निर्मितीस प्रेरक असल्याचे ते म्हणाले. 




          यावेळी विविध वाचनालयातील ग्रंथपाला यांनी आपली मनोगत होते. व्यक्त केली मान्यवरांच्या हस्ते उपस्थित ग्रंथपाल श्रीमती रेणुका पालवे ,प्रा.संगीता निमसे, सौ स्वाती कडनोर, सौ .शीला बारावकर, सौ सुवर्ण बोरनारकर,




श्री संदीप नन्नवरे ,श्री अमोल इथापे, श्री.नितीन भारताल, सौ.भाग्यश्री पांढरे कुमारी पल्लवी कुक्कडवाल,सौ वर्षा जोशी श्री संजय गाडेकर, आर्यन मडुर, ओम केदारे,आदीचा सन्मान करण्यात आला. 




      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा रसाळ, मान्यवरांचा सत्कार संचालक किरण आगरवाल तर आभार राहुल तांबोळी यांनी मानले.