स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
नगर – प्रतिनिधी | स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कलाम कोचिंग सेंटरच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. आर. कन्स्ट्रक्शनचे संचालक तथा माजी उपमहापौर हाजी नजीर आणि प्रमुख पाहुणे म्हणून इंगळे मेडिकलचे संचालक फरहान शेख उपस्थित होते.
यावेळी माजी उपमहापौर हाजी नजीर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी केलेल्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा आणि भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मेहनत, शिस्त आणि शिक्षणाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह देशाचे नाव उज्ज्वल करावे, असेही हाजी नजीर यांनी यावेळी सांगितले.
फरहान शेख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी भविष्यातही मोठे यश संपादन करावे, असे सांगितले.
या सत्कार सोहळ्यात इयत्ता १२ वीतील सैफ इम्रान खान, तसेच इयत्ता १० वीतील माहिनूर आदिल शेख, जारा शकील शेख आणि सय्यद फातेमा शाहनवाज या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कलाम कोचिंग सेंटरच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. शेवटी मुस्तकीम सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.



.jpeg)

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com