अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना राष्ट्रपती पदक बहाल
नगर - नांदगाव शिंगवे येथील रहिवाशी व ठाणे पोलीस अप्पर आयुक्त संजय जाधव यांना उल्लेखनीय व गुणवत्ता पूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. श्री जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दिलेल्या दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेउन त्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली.
त्यांनी नांदेड,पुणे,मुंबई,कल्याण येथे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नांव लौकिक मिळविला आहे. जुलै २०२४ मध्ये त्यांनी ठाणे येथील पदभार स्वीकारला आणि २०२५ मध्ये त्यांची पदोन्नती होउन सध्या अपर पोलीस आयुक्त ठाणे येथे कार्यरत आहेत.
याआधी त्यांना विविध पुरस्कार मिळालेली आहेत. त्यामध्ये सुरक्षा पदक (२०००), पुण्यभूषण पुरस्कार (२००६), आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल झाली आहेत.राष्ट्रपती पदक बहाल झाल्याबद्दल श्री जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
.jpeg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com