चितळेरोडवर १५ दिवसा पासून सकाळी रोज वाहते गटाराचे पाणी 

चितळेरोडवर १५ दिवसा पासून सकाळी रोज वाहते गटाराचे पाणी



                नगर-येथील चितळेरोडवर १५ दिवसापासून रोज   सकाळी   गटाराचे पाणी वाहते त्याचा त्रास हा सर्वसामान्य पादचारी,गाडीवाले व येथील व्यवसायिकांना होत आहे अनेक वेळा अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त,मनपा प्रशासन,महावितरण कार्यालय,प्रभाग अधिकारी व आरोग्य अधिकारी, महापौर उपमहापौर याना भेटून व अनेक वेळा निवेदने देऊन हि त्रास बंद व्हायला तयार नाही, येथील गटार  चौकअप झाली कि ६ महिन्यात पुन्हा हे पाणी वाहायला सुरुवात होते.
 


              तेलीखुट पासून दत्त मंदिर चौपाटी कारंजा असा मोठा पावसाळी नाला चितळेरोड पोलिस चौकी समोर सदर नाल्यावर महावितरणची डी पी मुळे चार वर्षापासून पूर्णपणे चोकअप आहे. सध्या महावितरणच्या डीपी मुळे नाल्याची साफ सफाई करता येत नाही.मनपाचे आरोग्य विभागाचे अनेक वेळा प्रयत्न केले त्यास यश आले नाही.



त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहते व नालीमधील घाण पाणी पावसाळया मध्ये चितळेरोड रस्त्यावर वाहते.त्यामुळे नागरिकांना व व्यावसायिकांना त्रास होतो व मनपा ची बदनामी होते.मनपा प्रशासनाने व आम्ही सदर डिपी बाबत महावितरणच्या अभियंता यांना समक्ष भेटून तसेच लेखी अनेक तक्रारी दिल्या परंतु काही कार्यवाही झाली नाही. 



                सध्या मनिष कलेक्शन चितळे रोड पासून लक्ष्मीबाई कारंजा या भुयारी गटारीचे व रस्त्याचे काम चालू आहे.चितळेरोड पोलिस चौकी समोरील बंद गटारीला बाय पास करून काम चालु असलेल्या भुयारी गटारीस जोडल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार प्रश्न सुटेल व काही अडचण येणार नाही तरी आपण या सामाजिक व महत्वाच्या विषयामध्ये लक्ष घालून कार्यवाही करावी अशी विनंती मनपाला लेखी निवेदनाद्वारे विनायक गोड,सचिन बिमन,तुलसीराम पालीवाल,विश्वजित राठोड(परदेशी),सागर लोखंडे,युनूस शेख,सतीश बत्तीनं,किशोर चोपडा,गोपाळ बागेरा, एस राज टेलर्स,एम आर टेलर्स,मोहन साठे आदींनी केली आहे