MOHD RAFI NIGHT | 'आज की शाम रफी के नाम' चे रविवारी आयोजन



 


 MOHD RAFI NIGHT | नगर : दर्शक |  हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त "आज की शाम रफी के नाम" हा विशेष संगीतमय कार्यक्रम रविवार दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सर्जेपुरा येथील रहमत सुलतान हॉल येथे रंगणार आहे.




या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध गायक व रफी प्रेमी सईद खान यांनी आयोजित केले असून, रफी यांच्या अजरामर गीतांचा सुरेल प्रवास रसिकांना अनुभवता येणार आहे.



या मैफलीत विद्या तंन्वर,अंजुम पटवेकर,आबीद हुसेन,अन्वर शेख, प्रशांत छजलानी, अनसार शेख, मुख्तार शेख, संजय भिंगारदिवे व सईद खान हे गायक गायिका मोहम्मद रफी यांच्या गाजलेल्या गीतांना आपल्या स्वरांतून सादर करणार आहेत. विविध भावछटांनी नटलेली प्रेमगीत, भक्तिगीत, गझल आणि देशभक्तीपर गीतांचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे.




रफी यांच्या सुवर्णकाळातील संगीताला उजाळा देत जुन्या हिंदी गीतांचा आनंद घेण्याची ही रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. संगीतप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून रफी यांच्या सुरेल आठवणींना उजाळा द्यावा, असे आवाहन आयोजक सईद खान यांनी केले आहे.