NAGAR VATCHNALAY | अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पुस्तक प्रदर्शनाने संपन्न

NAGAR VATCHNALAY | थोर समाज सुधारकांचे सामाजिक साहित्यिक योगदान आजही प्रेरक - डॉ. राजा ठाकूर





NAGAR VATCHNALAY | नगर : दर्शक | स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनुभवातून लिहिलेले प्रबोधनात्मक साहित्य तसेच लोकमान्य टिळक यांचे सामाजिक ऐक्य आणि देशप्रेम जागृत करणारे कृतीयुक्त विचार व साहित्य आजही समाजाला प्रेरणादायी असल्याचे उदगार जिल्हा वाचनालयचे अध्यक्ष डॉ.राजा ठाकूर यांनी काढले. 



              जिल्हा वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .यावेळी प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे संचालक संजय चोपडा, वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड,संचालिका शिल्पा रसाळ, किरण अग्रवाल ग्रंथपाल अमोल इतापे सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताला, पल्लवी कुकडवाल, वर्षा जोशी ,संजय गाडेकर, आशिष तरोटे ,ओम केदारे तसेच वाचक कर्मचारी उपस्थित होते. 





       यावेळी संजय चोपडा यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालक महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली "लेखन प्रेरणा दिनानिमित्त "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचनालयाचे वाचक राजेश भालेराव यांनी वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा रसाळ  यांनी केले .संचालक संजय चोपडा यांनी या उपक्रमानिमित्त वाचकांना साहित्याचे वितरण केले. आभार ग्रंथपाल अमोल इतापे यांनी मानले.