झेंडीगेट येथे एनसीएमसी NCMC स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन
नगर : दर्शक । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या NCMC एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.
हे शिबिर दर्शक प्रेस, झेंडीगेट पोलीस चौकीसमोर, झेंडीगेट, अहिल्यानगर येथे सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत होणार आहे.
या शिबिरामध्ये प्रवाशांना एनसीएमसी NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी व कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डद्वारे सुरक्षित व जलद डिजिटल पेमेंटसह महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दिव्यांग प्रवाशांना विविध प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी शेख अयान (९२२५३२३५३५) व आदिल शेख (७६६६६०२६६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com