Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलतर्फे रिमांड होममध्ये रक्षाबंधन उत्साहात
नगर - रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रलतर्फे डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन संचालित मुला-मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह, झारेकर गल्ली येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बालगृहातील मुलींनी रोटरिअन्सना तसेच रिमांड होम मधील मुलांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला.मुलींना राख्या, मेहंदी कोन व शृंगार साहित्य तर मुलांना खेळणी, मिठाई व फुगे वाटप करण्यात आले. तसेच ८ आयटीआय विद्यार्थ्यांना ₹ 6500/- ची स्टेशनरी, शेंगदाणे व बालशिशूंसाठी दूध पावडर डबे प्रत्येकी 1 किलो देण्यात आली.
रोटरी क्लबतर्फे हा सेवाभावी उपक्रम गेल्या ३८ वर्षांपासून सातत्याने राबविला जात असून, संस्थेच्या गरजेनुसार विविध प्रकारचे सहाय्य केले जाते.
यावेळी क्लब अध्यक्ष रो.अमर गुरप यांनी सर्व मुला-मुलींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रोटरीच्या सात फोकस एरियांची शिक्षण, आरोग्य, शांतता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, सामाजिक विकास आणि पाणी व स्वच्छतेची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या प्रसंगी स्नेहा गुरप, सचिव रो. सुनील मुथा, आयपीपी रो. सुनील कटारिया, सुजाता कटारिया, विनोद बोरा, विजय जुन्द्रे, निवृत्ती झिने, मनोज चांदेडिया व त्यांच्या मातोश्री, उमेश रेखे, अमृत कटारिया, निलेश मेहेर, डॉ. कुणाल कोल्हे, ज्ञानेश्वर दुधाडे, प्रभाकर बोगा तसेच संस्थेच्या अधीक्षक सौ.माने मॅडम, शिक्षकवर्ग स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
रोटरी सदस्य आणि बालगृहातील मुला-मुलींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम आनंदी व भावनिक वातावरणात साजरा झाला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com