पारंपरिक गाणी, नृत्य व खेळांनी महिलांनी जपली संस्कृतीची परंपरा

मानसी डान्स स्टुडिओतर्फे श्रावणात मंगळागौर उत्सव उत्साहात





नगर : दर्शक । मानसी डान्स स्टुडिओच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त २४ ते ३१ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर शिबिराची सांगता पारंपरिक मंगळागौर गाणी, नृत्ये आणि खेळांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाने झाली. माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या २९ महिलांनी विविध पारंपरिक मंगळागौर गाणी व खेळांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.




          कार्यक्रमास गुरुवर्या सुरेखा डावरे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अविनाश मिसाळ, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी, प्राचार्य शाम गणवीर, डॉ. दमन काशीद, डॉ. गायत्री कुलकर्णी, उपप्राचार्य सुवर्णा गणवीर, इंजि. सुनील बोरुडे, डॉ. मधुकर काळे, तेजस्विनी भानुदास आहेर, अर्चना शिंदे, उद्योजक संतोष शिंदे, इंजि. केतन देठे, अर्जुन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.



          मंगळागौर उत्सवातील सहभागी महिलांनी सुप्रसिद्ध तबला व ढोलकीवादक मास्टर गुलाब नेटके यांच्या ढोलकीच्या ठेक्यावर ‘नाच गं घुमा’, ‘किस बाई किस’, ‘धपोरी घाल पोरी’, ‘कुरकुली’, ‘आगोटा पागोटा’, ‘तांदूळ सडू’, ‘आवळा वेचू’ आदी पारंपरिक गाणी व खेळांचे सादरीकरण केले. पारंपरिक वेशभूषा, उत्साहपूर्ण नृत्य आणि लयबद्ध ठेक्यामुळे संपूर्ण सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.




          मंगळागौर उत्सव टीममधील साधना घोडके, सीमा देशमुख, मीना कटारनवरे, कल्पना कांबळे तसेच व्यवस्थापक मंडळातील इंजि. संजीव घोडके, डॉ. शैलेंद्र खंडागळे, बाळासाहेब शिंदे, विक्रम देशमुख, हर्ष गायकवाड व हर्षित भिंगारदिवे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी सुप्रसिद्ध राष्ट्रीय तबला व ढोलकीवादक मास्टर गुलाब नेटके यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.



         गुरुवर्या सुरेखा डावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मानसी डान्स स्टुडिओने गेल्या चार वर्षांपासून सातत्याने मंगळागौर शिबिराच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या काळात विस्मरणात जात असलेल्या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, संस्कृती आणि पर्यावरणपूरक उत्सव यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.




         या कार्यक्रमास ‘सुविधा मार्केट’, ‘पद्मसिद्ध ट्रेंड्स’, ‘सारी मानिया’, ‘डॉ. काशीद हॉस्पिटल’, ‘मी राजहंस लर्निंग डेव्हलपमेंट अँड थेरपी सेंटर फॉर चिल्ड्रेन’, ‘परिहार व्यसनमुक्ती, पुनर्वसन आणि मानसिक आरोग्य केंद्र’, ‘ट्रीपवर्स क्यूरेशन’, ‘महादेव इंजिनियर्स अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स’, ‘हॉटेल सह्याद्री पॅलेस’ आणि ‘ब्राईट अँड व्हाईट डेंटल क्लिनिक’ यांनी प्रायोजकत्व दिले. कार्यक्रमाचे निवेदन विनय कसबेकर व डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी केले. आयोजिका मानसी प्रणेश गायकवाड व प्रतिभा देठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.