केडगावातील प्रकरण; जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश

नगर गांजा प्रकरण | गांजाची झाडे लावल्याप्रकरणी अटक आरोपीस जामीन मंजूर


नगर : दर्शक । १६ सप्टेंबर २०२६। -केडगाव (ता.जि. अहिल्यानगर) येथील आरोपी विकास बाळू उमाप याने राहते घराजवळ गांजा झाडाची लागवड केलेबाबत गोपनीय माहीती येथील कोतवाली पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती. 


त्यानुसार संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी छापा टाकला असता आरोपीचे घराजवळ काही गांजाची झाडे आढळून आल्याने आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस अटक करण्यात आली होती.


सदर आरोपी याने अहिल्यानगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर केला असता सदरचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.कुलकर्णी यांनी मंजूर केला. 



याप्रकरणात आरोपीतर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत नियुक्त उपमुख्य लोकअभिरक्षक अॅड. प्रसाद गांगर्डे व सहा. लोकअभिरक्षक अॅड. पुनम जानराव - मुनोत यांनी काम पाहिले.