जिव्हेश्वर शिवालयात श्रावण मास निम्मित रविवारी विविध कार्यक्रम 




               नगर-सावेडी येथील गावडे मळा, आर्ट ऑफ लिव्हिंग समोर,  पाईप लाईन रोड येथील जिव्हेश्वर  शिवालय मंदिरात  श्रावण महिन्याच्या निम्मिताने सलग ४ थ्या  वर्षी  स्व.श्रीनिवास जयकुमार कनोरे यांच्या प्रेरणेने   धार्मिक व सामाजिक उपक्रम रविवार, दि.०६ सप्टेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजन वैभव आहेर यांनी दिली.





           जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळाच्या या मंदिरात  प्रतिवर्षीप्रमाणे पवित्र श्रावण मास निमित्त सकाळी अभिषेक नंतर राधिका ग्रुप (महिला मंडळ) भजन सकाळी १० वा वृक्षारोपण कार्यक्रम सकाळी ११ वा.नंतर आरती व महाप्रसाद दुपारी १२ वा.होणार आहे यावेळी  प्रमुख आकर्षण बाबा बर्फानी अमरनाथ (भव्यदिव्य बर्फाचे शिवलिंग) असणार आहे.



 

            महाप्रसाद(अन्नदाते) सुखदेव  शेडाळे,मंगल राजेन्द्र शेडाळे,श्रध्दा राजेंद्र शेडाळे,शिवजीत बलभिमराव डोके हे आहेत तर  विशेष सहकार्य श्रीमती निलिमा कनोरे, मृणाल कनोरे,अध्यक्षा, जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळ,मंदा  पिंपरकर,सोमनाथ  खाडे,प्रकाश  मारवाडे यांचे आहे.




 

          यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक संपत बारस्कर,विजय पुंडे (गुरुजी),संजय झिंजे, संदिप दातरंगे, सुनिल त्र्यंबके,सागर  मुर्तडकर,डॉ. सागर बोरुडे, चंद्रकांत शेळके , महेश कांबळे (पत्रकार),कुलदिप भिंगारदिवे, अमित खामकर,रोशनी त्र्यंबके,किरण बारस्कर,छाया  दिवाणे, स्नेहल  कौसल्या,बाबासाहेब  गेरंगे आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहे.





 

             स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ,भगवान श्री जिव्हेश्वर मंदिर(दिल्लीगेट),स्वकुळसाळी महिला मंच,जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, जिव्हाळा प्रतिष्ठान,माता अंकिनी दशांकिनी महिला मंडळ, नर्मदेश्वर महादेव मंदिर,श्री बेलेश्वर ग्रुप,मनोहर कलेक्शन,कापड बाजारयांचे सहकार्य आहे सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री व सौ. वैभव संभाजी आहेर,युवक अध्यक्ष, पुजारी व जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळ,सावेडी यांनी केले आहे