New Arts College Nagar | स्पुक्टोचा सुवर्णमहोत्सवी सोहळा दिमाखात; ‘सुवर्णसंचित’ स्मरणिकेचे प्रकाशन

New Arts College Nagar | एक प्रभावी नेता अनेक प्रभावी नेतृत्वास जन्म देत असतो - डॉ. अशोक बर्मन










 New Arts College Nagar | नगर : दर्शक । नगर-सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठ अध्यापक संघटनेचा (स्पुक्टो) सुवर्णमहोत्सवी सोहळा व सुवर्णसंचित या स्मरणिकेचा प्रकाशन समारंभ नुकताच नगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजषी शाहू सभागृहात, दिमाखदारपणे पार पडला. एक हजार पेक्षा जास्त प्राध्यापक व प्राचार्य या कार्यक्रमास हजर होते. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेंद्र देवळाणकर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. सी. आर. सदासिवन (माजी अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ व डॉ. प्रवीण रघुवंशी (अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ यांनी मार्गदर्शन केले.






        या कार्यक्रमास डॉ. अशोक बर्मन, माजी महासचिव अखिल भारतीय प्राध्यापक संघटना (आय. फकटो) कोलकाता येथून उपस्थित राहून अध्यक्षस्थान भूषविले. एक प्रभावी नेता अनेक प्रभावी नेतृत्वास जन्म देत असतो अशा भावना डॉ. अशोक बर्मन यांनी मांडली. 






        संचालक डॉ. देवळाणकर यांनी उच्च शिक्षण स्तरावर असणारी आव्हाने, शासनाचे विविध उपक्रम व भावी योजना याबाबत सुतोवाच केले. संघटनेची पन्नास वर्षाची गौरवशाली वाटचाल व भविष्यातील आव्हाने, याचे सुरेख विवेचण सुवर्णसंचित या स्मरणिकेत रेखाटले आहे. शिक्षण व विकास, कृत्रिम बुद्धीमत्ता व शिक्षणाचे बदलते स्वरूप, उच्च शिक्षणच्या नव्या दिशा, शैक्षणिक धोरण-२०२० अपेक्षा व वास्तव या बाबत कुलगुरु, शिक्षण तज्ञ, विचारवंत यांचे अभ्यासपूर्ण लेख स्मरणिकेत समावेश आहेत. स्पुक्टो संघटना पन्नास वर्षाची वाटचाल, भूतपूर्व पदाधिकारी यांचा परिचय व योगदान, संघटनेनी जपलेली सामाजिक बांधिलकी, संघटनेने राबवलेले विविध उपक्रम यांचा विस्तृत लेखाजोखा या स्मरणिकेत घेण्यात आला आहे. 





        या प्रसंगी संघटनेची वाटचाल दर्शविणारी डॉक्युमेंटरीचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कान्ह गिरमकर तर सुवर्ण संचित संपादक डॉ. शामराव लवांडे यांनी संपादकीय मनोगत व्यकत केले. जेष्ठ पदाधिकारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्पुक्टोचे संस्थापक सहसचिव प्राचार्य खासेराव शितोळे, संस्थापक पदाधिकारी प्रा. एस. जे. भिरुड याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.       






          संयुक्त पुक्टोचे शेवटचे अध्यक्ष प्रा. युवराज वाणी यांनी तत्कालीन परिस्थिती व संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. लखनौ वि‌द्यापिठ माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे हे विशेष निमंत्रित कार्यक्रमास हजर होते. महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठ अध्यापक घटक संघटनेचे पदाधिकारी यांनी या प्रसंगी उपस्थित राहून स्पुक्टो च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र दरे, सहसचिव मा. मुकेश मुळे, खजिनदार अॅडव्होकेट मा. दिपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मा. जयंतराव वाघ यांनी प्रत्यक्ष हजर राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.






        आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण ताटेदेशमुख व सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पुक्टो अध्यक्ष प्रकाश वाळुंज, सचिव प्रवीण ताटेदेशमुख, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांचे नेतृत्वाखाली पुक्टो पदाधिकारी, अहिल्यानगर जिल्हा पदाधिकारी, सिनेट सदस्य, स्थानिक शाखेचे सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष एम. एम. ताटे, सचिव प्रा. होलेहुन्नूर व अनेक सेवा सेवानिवृत प्राध्यापक या प्रसंगी उपस्थित होते.