Burhannagar | बुऱ्हाणनगर मध्ये देवीची यात्रा संपन्न,देवीचे व पालखीचे आ.कर्डिलें व महापौर ज्योती गाडे यांनी केले पूजन
नगर : दर्शक । नवरात्र उत्सव तुळजापूर देवीच्या माहेरी बुऱ्हानगर मध्ये मोठया भक्तिभावाने साजरा होत आहे.दरवर्षी प्रमाणे नवरात्राच्या तिसऱ्या माळेला यात्रा भरवण्यात आली होती व गावात पालखी मिरवण्यात आली,प्रथम मिरवणुकीने आ.अक्षय कर्डिलें व महापौर ज्योती गाडे हे बहीण भाऊ मंदिरात आले देवीची पूजा केल्यावरआलेल्या पलंगाचे पूजन करून मिरवणूक सुरू करण्यात आली .अशी माहिती पालखीचे मानकरी सागर भगत यांनी दिली.
यावेळी युवा नेते संदीप कर्डिले,सरपंच रावसाहेब कर्डिले,उपसरपंच जालिंदर जाधव,रवी कर्डिले,सागर भगत,निलेश साळे,भाऊसाहेब कर्डिले,शांताराम कर्डिले,संतोष लवांडे,डॉक्टर राहुल भोसले,निलेश अवघडे आदींसह पालखीचे मुख्य मानकरी व बु-हाणनगर देवीचे पुजारी सुदाम जगन्नाथ भगत,ज्ञानेश्वर गोकुळ भगत,शिवराम उत्तम भगत,संतोष मधुकर भगत,देवीदास भिमराव भगत,सागर बाळासाहेब भगत,दिपक प्रभाकर भगत,वसंत गणपत भगत,निलेश बद्रीनाथ भगत, मंगेश शिवाजी भगत आदींसह हजारो भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
आई तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुऱ्हानगरमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त भक्तीचा उत्साह निर्माण झाला आहे. आई तुळजा भवानीच्या पालखीचे गावात आगमन होताच भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांनी केवळ उपस्थिती न लावता स्वतः पालखी खांद्यावर घेत मंदिराला प्रदक्षिणा घातली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांनी स्वतः ढोल वाजवत आई तुळजाभवानीच्या पालखीच्या स्वागतामध्ये सहभाग घेतला.
बुऱ्हानगर आणि आई तुळजाभवानी यांचे नाते श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाने जोडलेले आहे. आई तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून या गावाची ओळख असून अनेक पिढ्यांपासून येथे पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्राच्या तिसऱ्या माळेला आई तुळजाभवानीची पालखी बुऱ्हानगर येथील मंदिरात दाखल होते. या पालखीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदाही पालखीच्या आगमनानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे सूर आणि आई तुळजाभवानीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com