Nagar Shivsena | आदित्य ठाकरें कडून शहर शिवसेनेच्या दुष्काळग्रस्त सहाय्यता हेल्पलाइची घोषणा

 



नगर  दर्शक । राज्यसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकरी मोठ्या संकटाला सामोरा जात आहे. अशा काळामध्ये शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. महानगर प्रमुख किरण काळे यांच्या संकल्पनेतून शहर शिवसेनेच्या वतीने ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

शहर शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांनी जोरदार स्वागत




नगर शहरात आले असतात त्यांचे शहर शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित राहत जोरदार स्वागत केले. यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, कामगार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, अल्पसंख्यांक आघाडीचे अनिस चुडीवाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाचे शहर प्रमुख सुशांत म्हस्के, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, राम वाणी, महिला आघाडीच्या उषाताई भगत, नलिनी गायकवाड, शैला लांडे, रत्नमाला वाणी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांशी अनौपचारिक संवाद साधत दुष्काळ जन्य परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मदत शेतकरी बांधवांना मदत करण्याबाबत शहर शिवसेनेच्या शिवसैनिकांना सूचना केल्या. यावेळी किरण काळे यांनी त्यांना उपक्रमाची माहिती दिली. ९०२८७२५३६८ या हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शहर शिवसेना सहाय्य करणार आहे. 

किरण काळे म्हणाले, अहिल्यानगर शहर हे जिल्हा मुख्यालय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशासकीय मदतीसाठी अनेक वेळा मुख्यालयी यावे लागते. मात्र बराच वेळेला अधिकारी, प्रशासन दात देत नाहीत. अशा प्रसंगात शहर शिवसेना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज असेल. शेतकरी हा बळीराजा आहे. तो जगला तर देश जगेल. या संकटाचा आपण एकजुटीने सामना करुयात असे काळे म्हणाले.