Sangamner News | संगमनेरमध्ये मौलाना आझाद यांना अभिवादन
संगमनेर : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात ११ नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्यलढ्यातील महान नेते आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. बाबा खरात होते. आपल्या भाषणात त्यांनी मौलाना आझाद यांच्या महान कार्याचा आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.
यावेळी जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटरचे अध्यक्ष इद्रीस शेख यांनी मौलाना आझाद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला संगमनेर साहित्यिक मंडळाचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, सचिव ज्ञानेश्वर राक्षे, जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटरचे अध्यक्ष इद्रीस शेख,उपाध्यक्ष सय्यद आसिफ अली, अन्सार सय्यद, बिंदू जहाँगिरदार तसेच कार्यालयातील अधिकारी हांडे, अरगडे आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com