*महापद्मसेनेच्या वतीने ‘ पद्मशाली प्रिमीअर लीग २०२३ अखंड पद्मशाली चषक’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ; शुभारंभ ८ मे रोजी वाडीया पार्क येथे होणार
अहमदनगर (प्रतिनीधी) - महापद्मसेना नगरशहराच्या वतीने पद्मशाली प्रिमीअर लीग २०२३ ‘अखंड पद्मशालीे चषक’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सोमवार दि. ८ मे ते रविवार १४ मे २०२३ दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अ.नगर येथे सोमवार दि.८ मे २०२३ रोजी दुपारी ४ वाजता प्रतिष्ठित मान्यवरांच्या यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप तसेच प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील जेष्ठ मान्यवर व पदाधिकारी, या सामन्यासाठी प्रायोजकत्व दिलेले सर्व मान्यवर संघमालक, सर्व खेळाडू, समाजातील बांधव आदी मान्यरांच्या उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापद्मसेनेचे शंकर जिंदम व रवि दंडी यांनी दिली.
स्पर्धा सोमवार पासून वाडिया पार्क क्रिडा मैदानावर मोठ्या जल्लोषात व क्रिकेटरसिकांच्या उपस्थितीत सुरू होत आहे. दररोज ४ सामने होतील. एकूण १० संघांच्या माध्यमातून सुमारे १६० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या सामन्यांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक नगरसेवक मनोजभाऊ दुलम, रवि दंडी, श्रीनिवास बोज्जा, हॉबी डिझायनर स्टुडिओ त्रिलेश येनगंदुल, लक्ष्मी टाईम्स् संजय मंचे, रेडिन्स हॉटेल दत्तात्रय रासकोंडा, गिरीश चिट्टा, संदीप दातरंगे, गोपाल न्यालपेल्ली, अभिषेक गुंटूक, दीपक आडेप, राहुल ग्राफिक्स शुभम पासकंटी, गुंडू मोबाईल बाजार प्रमोद गुंडू, श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था, चाय मस्का रोहित कोडम, श्री ज्वेलर्स श्रीकांत मंडाल, राधिका ग्राफिक्स चेतन नागुल आहेत. स्पर्धेसाठी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, अशी माहिती महापद्मसेनेचे अमोल येनगंदुल, रोहिदास बुरम, राजेंद्र इगे यांनी दिली.
महापद्मसेनेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. आणि आजच्या या धकाधकीच्या युगात तरुणांना मोबाईल पासून दूर ठवुन मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज मोबाईलच्या अतिवापरामुळे युवक भरकटला जावुन वेगवेगळ्या व्यसनांच्या आधिन होवुन लागला आहे. त्यामुळे आज मैदान खेळांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठीच या पद्मशाली प्रिमीअर लीग २०२३ भव्य टेनिस बॉल क्रिेकट स्पर्धा आयेाजित करण्यात आली असल्याचे महापद्मसेनेचे विनोद बोगा, उदय सुरम व किरण वल्लाकट्टी, यांनी सांगितले.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक २१ हजार रोख व सन्मानचिन्ह असे आहे. या प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच जी.एन.स्पोर्ट्स गोपाल न्याल्पेल्ली यांच्या कडून बॅट व लक्ष्मी टाईम्स कडून मॅक्सिम वाच व श्रीनिवास बोज्जा यांच्या कडून ट्रॉफी देण्यात येणार आहे तसेच उत्कृष्ट गोलंदाजास रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह, फलंदाजास रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि मॅन ऑफ द सिरीज मिळविणार्यास रोख पारितोषिक व सन्मचिन्ह देण्यात येईल. ही माहिती विनोद बुरा, विनीत बुरला यांनी दिली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महापद्मसेनेचे शंकर जिंदम, अमोल येनगंदुल, रवि दंडी, विनोद बोगा, रोहिदास बुरम, राजेंद्र इगे, उदय सुरम, विनोद बुरा किरण वल्लाकट्टी, विनीत बुरला, अमित बिल्ला, अमोल बिज्जा, संजय बोगा, रमेश गाजुल, प्रविण शिरापुरी गोविंद नामन, दिपक बुरला, निलेश गंगुल, प्रविण बुरा, अभिजीत येनगंदुल, गोपाल न्यालपेल्ली, दर्शन येमुल गितेश सादुल, अक्षय दुस्सा, रोहित अलवाल, राज नागुल, आनंद येनगंदुल, प्रणव बोगा, रमेश आकुबत्तीन, पंकज धेंड, अक्षय संभार, शुभम अंकारम, विष्णु रायपेल्ली आदी परिश्रम घेत आहेत. क्रिकेटचे सामने अतिशय चुरशीचे होणार आहे, क्रिकेट रसिकांनी व समाज बांधवांनी स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com